Share

मैदाने खुली करा अन्यथा; खेळ संपेल, खेळाडू संपतील!

Published On: 

औरंगाबद : कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे खेळाची मैदाने, व्यायामाचे ठिकाणे जॉगिंग पार्क आणि गार्डन बंद करण्यात आलेली आहे. मात्र त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि खेळाडूंना सराव करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे लवकरात लवकर ही सर्व ठिकाणी सुरू करावीत असे निवेदन मुख्यमंत्र्यांना औरंगाबाद विभागाच्या क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे(Urmila Morale) यांच्या मार्फत औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशन संस्थेतर्फे देण्यात आले आहे. अन्यथा खेळ तर संपेलच मात्र खेळाडूही संपतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोना या आजारात लसीकरण, विलगीकरण, मास्क सॅनिटायझर आणि उपचारासह प्रतिकारशक्ती आणि सकारात्मक मानसिकतेची आवश्यकता असते. खेळाची मैदाने, व्यायामाची ठिकाणे, जॉगिंग पार्क आणि गार्डनमध्ये शारीरिक अंतर ठेवून केलेल्या हालचालीमुळे कोरोना संसर्गाचा धोका उद्भवत नाहीत.  या उलट पुरेसा व्यायाम आणि खेळ यामुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती व सकारात्मक मानसिकता विकसित होण्यास मदत होईल.  त्याशिवाय आगामी काळात स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

त्यात सहभागी होऊन यश संपादन करण्याकरिता खेळाडूंना सराव अत्यंत महत्वाचा आहे. हा सराव नसेल तर ते अपेक्षित यश मिळू शकणार नाहीत. आज हजारो खेळाडू घरामध्ये बंद आहेत.  त्यांना सरावाची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर कडक निर्बंधांचे आदेशामुळे क्रीडा प्रशिक्षकांचे उपजीविकेचे साधन देखील बंद झाले असून त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन ही सर्व ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि खेळाडूंसाठी सुरू करावी, अशी मागणी औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनतर्फे करण्यात आली. यावेळी औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद केंद्रे यांची प्रतिनिधिक उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!