🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाने वर्षभरापासून विस्कळीत झालेली विमानसेवा आता हळूहळू पूर्ववत होत आहे. औरंगाबाद विमानतळावरुन १२ जुलैपासून मुंबई-औरंगाबाद-मुंबई हे विमान सुरू करण्याची घोषणा इंडिगो कंपनीकडून नुकतीच करण्यात आली आहे. या विमानाचे वेळापत्रक बदलण्यात आले असून मुंबईहून औरंगाबादला येणार्या प्रवाशांसाठी हे विमान अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
पूर्वी औरंगाबाद विमानतळावरून इंडिगो कंपनीचे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, बंगरूळू आणि अहमदाबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू होती. मात्र कोरोना संकटामुळे या मार्गावरील विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत दिल्लीनंतर आता हैदराबाद या दोन शहरांसाठी देखील इंडिगोची विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद ते मुंबई मार्गावर सध्या एअर इंडियाची मुंबई औरंगाबाद दिल्ली ही एकमेव विमान सेवा सुरू आहे. या विमानाला प्रतिसाद जास्त आहे. औरंगाबाद मुंबई मार्गावर इंडिगो विमान पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर आगामी १२ जुलै पासून मुंबई औरंगाबाद मुंबई हे विमान आठवड्यातील चार दिवस चालविण्यात येणार असल्याची माहिती इंडिगो कंपनीकडून देण्यात आली आहे. तसेच येत्या ५ जुलैपासून दिल्ली आणि हैदराबाद शहरासाठी विमान सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिक आणि पर्यटकांना या विमानसेवेचा मोठा लाभ होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जमात -ए- इस्लामी हिंदतर्फे शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव
- वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, औरंगाबादेतून पाच दुचाकी लंपास
- मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं असं वाटतं का? अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर
- जुने बसथांबे झाले मद्यपी, बेघरांचे निवारागृह!
- ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना अद्दल शिकवा, त्यांना ठेचा, मी शस्त्र व ताकद पुरवतो’, शिवसेना आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य


