Share

वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, औरंगाबादेतून पाच दुचाकी लंपास

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : शहर परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून शहराच्या विविध भागातून चोरट्यांनी पाच दुचाकी लंपास केल्या आहेत. युनूस शब्बीर खान पठाण (वय २५,रा.चौकावाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीए-६८७५) चोरट्याने २४ जून रोजी तलाठी कार्यालयाच्या आवारातून चोरून नेली. प्रकाशचंद्र भवरलालजी बाटीया-जैन (वय ५३,रा.बंजारा कॉलनी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीके-१६२५) चोरट्याने २९ जूनच्या रात्री घराजवळून चोरून नेली.

संतोष कचरू बहादुरे (वय ३०,रा.वानखेडे नगर, हडको) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएल-१२१६) चोरट्याने २४ जून रोजी एमआयडीसी वाळूज परिसरातील ट्रिनेटी म्हाळसा दुर्गा सेल्स अ;ॅण्ड सव्र्हीसेस समोरून चोरून नेली. दिलीप भिमराव काळे (वय ५८,रा.शिवाजीनगर, वाळूज) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एके-३५५०) चोरट्याने २८ जून रोजी रेल्वेस्टेशन परिसरातील पोस्ट ऑफीस समोरून चोरून नेली. गारखेडा परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीक्यू-६५२५) चोरट्याने २६ जून रोजी गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉल समोरून चोरून नेली.

शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सिटीचौक, क्रांतीचौक,एमआयडीसी वाळूज, उस्मानपुरा आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!