Share

जमात -ए- इस्लामी हिंदतर्फे शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जमात-ए- इस्लामी हिंद औरंगाबाद महिला रिंग च्या वतीने शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा कोरोना योद्धा म्हणून बुधवारी सन्मान करण्यात आला. त्या कार्यक्रमात दामिनी पथक व कम्युनिटी पोलिसिंग च्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा ही कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला अशी माहिती दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे यांनी गुरुवारी दि. १ रोजी दिली.

निर्मला निंभोरे म्हणाल्या की सदरील कार्यक्रर्मात भरोसा सेल व दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाने कमुनिटी पोलिसिंग दामिनी पथक डायल ११२ व नागरिकांना मिळणाऱ्या मदती विषयी आम्ही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात संयोजक फहीमुननीसा, मोहन सीमा मुस्लिम समाज महिला भगिनी व शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला या वेळी उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाला यात प्रत्येक समाज कसा महत्त्वाचा आहे एकता कशी टिकवून ठेवावी यावरही तज्ञ महिलांनी मार्गदर्शन केले व या सत्काराला मुळे आम्हाला अजून काम करण्याची प्रेरणा व नवीन पाठबळ मिळाल्याची भावना ही निर्मला निंभोरे यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!