🕒 1 min read
अहमदनगर : पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात सादर राज्य तहसिलदार आणि नायब तहसिलदार संघटनेच्या अहवालात देवरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे या अहवालाची चौकशी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज तहसीलदार संघटनेच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. संघटनेच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत.
यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी ‘मी आता सावरले आहे पण मला होणारा त्रास थांबलेला नाही’, असे नमूद करत यावेळी परत एकदा गंभीर आरोप केले. तसेच व्हायरल क्लिपबाबतचं सत्य सांगतानाच अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाल्या ज्योती देवरे :
जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ती माझीच आहे पण ती मी व्हायरल केलेली नाही. माझ्या भावाने एका पत्रकार मित्राला दिली आणि मग व्हायरल झाली. क्लिप व्हायरल झाल्यावर अनेकांनी मला धीर दिला आणि मी त्यातून आता सावरले आहे.वेळ आल्यावर आपलीही विचारशक्ती संपते, याचा मी अनुभव घेतला. माझ्या विरुद्ध पाठविलेल्या अहवालात अनेक तांत्रिक चुका आहेत.
या चौकशी अहवालाला घाबरून मी हे काहीच केलेले नाही पण माझ्यावर जो दबाव आणला जात होतो, जी भीती दाखविली जात होती त्यातून मी नकारात्नक विचार केला. आता त्यातून मी बाहेर पडले पण त्रास थांबलेला नाही. विरोधकांना अद्यापही पाझर फुटलेला दिसत नाही. मी कोणाची नावं घेतली नाही, घेणारही नाही. त्यांनी स्वत:च समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे.
माझा पाठमोरा फोटो छापून अण्णा हजारे यांनी मला हाकलून दिल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या गेल्या. माझे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. पण हे सर्व खोत असून मला बदनाम केले जात आहे. महिला अधिकारी म्हणून जी अवहेलना होते, ती दाखवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माझे समुपदेशन केले.
त्यामुळे वाईट विचारातून मी बाहेर पडले. आता लढण्यासाठी आणि कर्तव्य बजावण्यासाठी पुन्हा मानसिकदृष्ट्या तयार झाले आहे. राज्यभरातील अधिकाऱ्यांनी आज पाठिंबा दिला आहे, राज्यभर आंदोलन होत आहे. आता माझ्या कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात येत आहेत. चौकशी समिती स्थानिक अधिकाऱ्यांची नको, त्यांच्यावर दबाव येत आहे. राज्यस्तरावरील समिती हवी, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता या सरकारचीच हंडी फोडण्याची वेळ आलीये’; आमदार अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल
- पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज
- भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ; हि गर्दी टाळली पाहिजे- आरोग्यमंत्री
- ‘लवकरच मोठे शतक येणार आहे’ विराटच्या आयसीसी क्रमवारीवर प्रशिक्षकाची प्रतिक्रिया
- ‘सुभाष जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू टळला असता मात्र त्यासाठी मंत्रालयात कोणी मंत्री तर हवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
