Share

मला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण…; अण्णा हजारेंनी देवरेंना दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

अहमदनगर :  पारनेरचे आमदार निलेश लंके आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातल्या वादावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केले आहे. मला या दोघांच्याही भांडणात मध्ये पडायचं नाही पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला त्यांनी तहसीलदार देवरे यांना दिला.

अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.

ज्योती देवरे यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अहवाल घेऊन आमदार लंके हे अण्णा हजारेंच्या भेटीला गेले होते. त्यावर, ‘मला तुमच्या भांडणात पडायचं नाही’, असं म्हणत अण्णांनी या वादात पडणार नसल्याचे सांगितले.

लंके आणि देवरे यांच्या आपापसातल्या भांडणामध्ये मला पडायचं नाही. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी या संबंधी काही बोलणार नाही. फक्त तहसीलदार मॅडमला सांगतो तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त आत्महत्येचा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला अण्णा हजारे यांनी तहसीलदार देवरेंना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!