Share

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधीचे वाटप- विजय वडेट्टीवारांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी दिली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात आनंदात जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ५५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटातून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून मदत केली जाणार आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील १८२ परिमंडळांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने राज्यातील मोठ्या प्रमाणावर खरीप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने नदीकाठच्या शेत जमीन व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा व विदर्भातील ओढे, नदी-नाल्यांना पूर आल्याने काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!