Share

रेल्वेच्या परीक्षेत हेराफेरी झाल्याचा आरोप; संतप्त विद्यार्थ्यांनी पेटवली ट्रेन

Published On: 

गया : बिहारमध्ये रेल्वे भरती बोर्डाच्या एनटीपीसी परीक्षेत हेराफेरी झाल्याचा आरोप करत आज तिसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याआधी मंगळवारी संतप्त विद्यार्थ्यांनी पाटणा, सीतामढी, मुझफ्फरपूर, आरा, बक्सर येथे रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले. दरम्यान, आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी संतप्त विद्यार्थ्यांनी गयामध्ये ट्रेन पेटवून दिली.

या घटनेबाबत गयाचे एसएसपी आदित्य कुमार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणाचीही दिशाभूल करू नये. सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नका. रेल्वेने एक समिती स्थापन केली असून ती चौकशी करणार आहे. काही विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. कारवाई सुरूच आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा एसएसपी आदित्य कुमार यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांची वाढता आक्रोश पाहता रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मागणीची चौकशी करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. प्रश्न सोडविण्यासाठी सर्व समित्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी ४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 

ते म्हणाले की, प्राथमिक परीक्षा हा एवढा मोठा टप्पा आहे की अनेकांची परीक्षा चुकली आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकार परीक्षा घेण्यास आणि नंतर निकाल जाहीर करण्यास वेळ घेत आहे. आमचे धोरण विद्यार्थी हिताचे आहे. आम्ही फक्त विद्यार्थ्याच्या हिताचा विचार करत आहोत.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या भरती परीक्षांच्या निवड प्रक्रियेबाबत केलेल्या हिंसक निषेधानंतर NTPC आणि लेव्हल-१ परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मंगळवारी, रेल्वेने उमेदवारांना नोटीस जारी केली होती की, निदर्शनादरम्यान तोडफोड करण्यासह इतर बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेल्या लोकांच्या भरतीवर कायमची बंदी घालण्यात येईल. बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर धरणे आंदोलन करणाऱ्या उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!