औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्याची विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड सुरू आहे. आणि कायमच सुरू राहणार आहे. कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असे सांगतानाच जिल्हा प्रशासनाच्या कामाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कौतुक केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्यास जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने लवकरच जिल्हा लसीकरणयुक्त होईल, अशी अपेक्षाही पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांनी आज व्यक्त केली. पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी देसाई बोलत होते.
कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून केलेल्या शुभेच्छा संदेशात देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शासनाने मागील दोन वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यामुळे कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संकटालाही खंबीरपणे सामोरे जाता आले. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल आहे.
जिल्ह्याने कोरोना लसीकरणाला प्राधान्य देऊन संपूर्ण जिल्हा कोरोना लसीकरणयुक्त व्हावा, यासाठी विशेष पुढाकार घेतला. जनतेनेही लसीकरणामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची दखल मंत्रिमंडळात घेतली याचा मी स्वत: साक्षीदार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली. सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे १० लाखांच्यावर लसीकरण झाले.
याकाळात पहिला डोस घेणारे लाभार्थी आता दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत. ४५ वर्षांवरील नागरिक, कोरोना योद्धे आदींसह ८१ टक्क्यांहून अधिकांनी पहिला, ४५ टक्क्यांनी दुसरा कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केलेली आहे. असे पालकमंत्री देसाई म्हणाले. यावेळी त्यांच्याहस्ते ‘निरामय आरोग्य’ पोस्टर, पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या :
- लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी युवकांचा पुढाकार महत्त्वाचा; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंचे प्रतिपादन!
- Health Updates: लता मंगेशकर १७ दिवसानंतरही आयसीयूमध्ये, तब्येतीत सुधारणा
- ओबीसी आरक्षणासह आगामी निवडणुका व्हाव्यात, अशी आमची भूमिका-अजित पवार
- संभाजीनगरचा विकास पाहायला लवकरच येणार; संत एकनाथ रंग मंदिर लोकार्पणात मुख्यमंत्र्यांची ग्वाही..!
- बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चनसह सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!


