मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाषण केले होते. यावेळी ठाकरेंनी भाजपवर (BJP) चांगलाच निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजप नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील शिवसेनेवर (Shivsena) टीका केली होती.
देवेंद्र फडणवीस टीका करताना म्हणाले होते की, आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमानाने अभिवादन करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्यासाठी एक ट्वीट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींकडून करुन दाखवा. त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते, अशी टीका फडणवीसांनी केली होती. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांचे दुखः आणि वेदना मी पाहत होतो. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने ट्विट केले नाही ही त्यांची वेदना आहे. मलाही त्यांची वेदना पाहून वेदना झाली. बाळासाहेब ठाकरेंना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करावा असे का वाटले नाही?, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे भारतरत्न तर होतेच. एक ट्विट केले नाही म्हणून तुम्हाला दुःख होत आहे. तुमच्या केंद्र सरकारने बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही याचा खुलासा केला की आम्हाला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ट्विटवर बोलता येईल, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
दीपिका पदुकोणने उलगडले बेडरूमचे रहस्य, म्हणाली “रणवीर बेडवर…”
लोकशाही प्रक्रियेत प्रजाच राजा; हा सोहळा मतदान करून साजरा करावा-अभिनेत्री चिन्मयी
VIDEO : …अन् बापानंच लगावली कानशिलात..! पाहा शिखर धवनसोबत नक्की घडलं काय?
औरंगाबादेत १५२ कोटींचे रस्ते; आरोग्य यंत्रणाही आता सक्षम-पालकमंत्री देसाई


