Share

‘…त्यामुळेच पुरस्कार नाकारले जातात’; संजय राऊतांचा खुलासा

Published On: 

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाषण केले होते. यावेळी ठाकरेंनी भाजपवर (BJP) चांगलाच निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजप नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील शिवसेनेवर (Shivsena) टीका केली होती. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसनी बाळासाहेबांच्या जयंती निमित्त एक ट्विट देखील केले नाही, असे वक्तव्यं केले होते यावर संजय राऊत म्हणाले, एक ट्विट केले नाही म्हणून तुम्हाला दुःख होत आहे. तुमच्या केंद्र सरकारने बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही याचा खुलासा केला की आम्हाला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ट्विटवर बोलता येईल, असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पद्मश्री पुरस्काराबद्दल देखील वक्तव्यं केलं आहे. संजय राऊत म्हणाले, फडणवीसजी तुम्ही इतक्या लोकांना पद्म पुरस्कार देता, मग तुमच्या केंद्र सरकारला बाळासाहेब ठाकरे यांना आजपर्यंत पद्मविभूषण किंवा भारतरत्न पुरस्कार द्यावासा का वाटला नाही. पश्चिम बंगालमध्ये तिघांनी पद्म पुरस्कार नाकारले आहेत, असंही यावेळी राऊत यांनी सांगितले.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी हे पुरस्कार परत का करतात याचे कारण सांगितले आहे. राऊत म्हणाले, श्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासह राज्यातील तीन लोकांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. या तिघांनीही पद्म पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार देताना त्यांना विचारणा झाली नव्हती. हल्ली उठसूट कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कार नाकारले जातात, हे चित्र बरोबर नाही. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिवंतपणी तुम्ही त्यांची किंमत करत नाही. बालाजी तांबे यांना गेल्या सात वर्षांमध्ये पुरस्कार का देण्यात आला नाही? या व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत. पण मरणोत्तर पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!