परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्री लागू केलेल्या संचारबंदीमुळे शहरातील रस्त्यांवर शनिवारी सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला.
काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग खुप वाढला आहे. कोरोना रुग्णांची वाढणारी साखळी तुटावी, संसर्ग थांबावा म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी (दि. 15) सकाळी सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान शनिवारी सकाळी शहरातील रस्त्यांवर खुप शुकशुकाट पहावयास मिळाला. किराणा दुकानांसह अन्य दुकानेही उघडलेली दिसली नाही.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणार्या नागरिकांची संख्या खुप कमीच होती. मात्र, विद्यापीठासमोरील बाजूस काही भाजी विक्रेते नेहमीप्रमाणे ठाण मांडून बसले होते. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास नवामोंढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे यांनी कर्मचार्यांसह येथील भाजी विक्रेत्यांना हटवले. एसटी महामंडळाने बसस्थानकातून बस देखील सोडल्या नाहीत. त्यामुळे येथून बाहेर गावी जाणार्या प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली.
दरम्यान शहरामधील मुख्य बाजारपेठेसह गांधीपार्क, कच्छीबाजार, गुजरी बाजार, स्टेडीयम मार्केटसह क्रांती चौक भाजी मंडईच्या परिसरात देखील चिटपाखरु देखील दिसले नाही. शहरातील कारेगाव रोड, वसमत रोड, गंगाखेड रोड , जिंतूर रोड, पाथरी रोड आदी मुख्य रस्त्यांवरही तुरळक ठिकाणी वाहनांची ये – जा होती. दवाखाना तसेच अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिक बाहेर पडताना दिसले. त्यामुळे दररोजची रस्त्यावरची वर्दळ शनिवारी एकदमच कमी झालेली दिसून आली. एकंदरीत परभणीकरांकडून लॉकडाऊन तसेच संचारबंदीचे कडेकोट पालन करत असल्याचे दिसले.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


