🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संसर्ग शहरात जोमाने पसरू लागला आहे. संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरी भागातच गुरुवारी ९०२ , तर शुक्रवारी ६१७ रुग्ण सापडले आहेत. महापालिकेने कोरोना टेस्टिंगची संख्या वाढवली आहे त्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना तपासणी केंद्रामध्ये होत असलेल्या रेटारेटी अन दाटीवाटीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे घोडे इथेच पेंड खात असल्याचे बोलले जात आहे.
शहरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाढत असलेल्या कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी आता महापालिका प्रशासनाने शासन निर्देशानुसार अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार शहरात नऊ केंद्रांवर दिवसभर आणि चार केंद्रांवर चोवीस तास कोरोना चाचणीची सोय प्रशासनाने केली आहे. सध्या कोरोना रुग्ण वाढत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील, लक्षणे आढळलेल्यांची तपासणी केंद्रांवर मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान एन-२ भागातील कम्युनिटी केंद्रावर तपासणी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केल्याचे ‘महाराष्ट्र देशा’च्या पाहणीत समोर आले. याठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर्स, इतर कर्मचारी वर्गाने योग्य नियोजन करुन तपासणी करण्यासाठी आलेल्यांना अंतर राखून उभे करण्यास सांगायला हवे.
मात्र अशी कुठलीही खबरदारी याठिकाणी घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. तपासणीनंतर सर्वच जण पॉझिटिव्ह येतील असे नाही मात्र याठिकाणी जवळजवळ उभ्या असलेल्यांमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; कोल्हापुरात महाराष्ट्र शासनाच्या बसवर दगडफेक
- २० वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार?
- ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’
- हिंगोलीकरांकडे पाणीपट्टीचे तब्बल साडे तीन कोटी थकित
- NEET परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
