कोलकाता- केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. तीन महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर या आंदोलनावरून नवं वादंग निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेलं भाष्य यावर देशातील काही दिग्गज कलाकारांनी व क्रिकेटर्सनी दिलेलं उत्तर, टूलकिट प्रकरण यामुळे या आंदोलनाने वेगळं वळण घेतल्याचं दिसून येत आहे.
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी भाजपच्या पराभवाचा चंग बांधला आहे. राकेश टिकैत यांनी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे कोलकाता गाठले आहे. ते दुपारी बंगालमधील शेतकरी नेत्यांशी चर्चा करतील. यानंतर सायंकाळी ते नंदीग्राममध्ये महापंचायत घेतील.
राकेश टिकैत म्हणाले की, बंगाल निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचे काम करू. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही मात्र लोकांना भाजपला पराभूत करण्याचे आवाहन करू. देशातील शेतकरी भाजपच्या धोरणांनी त्रस्त आहेत असा आरोप टिकैत यांनी केला.
कोणाचेही नाव न घेता राकेश टिकैत म्हणाले, ‘दिल्लीतील दरोडेखोरांना तेथून पळ काढावा लागेल. आंदोलन पुढे नेण्यासाठी टिकैत यांनी ‘एक गाव, एक ट्रॅक्टर, 15 माणसे आणि 10 दिवस’ अशी घोषणा दिली आहे याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, शेतक्यांनी पुढील दहा दिवस तयारी करावी. त्यांना दिल्लीला करण्यासाठी कधीही बोलावले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार चित्रपट; अजय-अतुल यांचे संगीत


