बीड : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन पुन्हा एकदा कडक नियम राबवण्यास सुरुवात केली आहे. पाचवी ते नववी आणि ११ चे वर्ग १० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता.
कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेग धरत असल्याने सर्वत्र सतर्कता आहे. अनेक जिल्ह्यांत शाळा बंदचा निर्णय घेतला जात आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातही आतापर्यंतच्या चाचण्यांत २८ शिक्षक, ६ विद्यार्थी आणि २ इतर कर्मचारी असे एकूण ३६ जण बाधित आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याबाबत पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवले होते.
सीईओ अजित कुंभार यांनी शाळा बंद करणे योग्य असल्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी १० मार्चपर्यंत ५ वी ते ९ वी व ११ वीचे वर्ग १० बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाॅझिटिव्ही दर १३% : दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचा दर १३ टक्के आहे, तर मृत्यूदरही चार टक्क्यांपर्यत जाऊन पोहोचला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यात ११ महिन्यांत प्रशासनाला यश आलेले नाही. बीड जिल्हा रुग्णालयापेक्षा अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचा मृत्यूदर अधिक आहे. तर, जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के इतका आहे.
५७ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू
बुधवारी ५७ रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई १९, आष्टी ६, बीड २१, धारूर १ व गेवराई, केज , माजलगाव, परळी, शिरूर प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.बुधवारी १९ जणांनी कोरोनावर मात केली. केज तालुरक्यातील विडा येथील ८४ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. एकूण बळींचा आकडा ५७४ इतका झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचा रंग बदलणार नाही’, तेंडुलकरचे महत्त्वपुर्ण वक्तव्य
- आखेर नायगाव येथील दारुबंदीला मिळाला हिरवा कंदिल
- 45 वर्षांवरील नागरिकांना 1 मार्चपासून लस मिळवण्यासाठी करावं लागेल ‘हे’ काम
- मराठा आरक्षणाचा लढा तीव्र; ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चाची तयारी सुरू
- लातूर पोलिसांकडून बुलेटचा आवाज चिरडला; धडक कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
