मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी ‘आरआरआर’ या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. आज अलियाच्या वाढदिवसाच्या औचीत्याने या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक सोशल मीडीयावर शेअर करत तिच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत केला आहे.
या लुकमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत आहे. सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करत आलियाने ‘सीता’ असे कॅप्शन त्याला दिले आहे. या चित्रपटात आलियाचे नाव सीता असणार आहे. यापूर्वी निर्मात्यांनी आलियाची एक पाठमोरी झलक समोर आणली होती. शेअर केलेल्या फोटोत आलिया एका ब्लॅक शेडेड जागेवर पाठमोरी बसलेली दिसतेय. आणि समोर श्री रामाची मुर्ती दिसतेय.
Sita ❤#RRR pic.twitter.com/xV7a1jglyY
— Alia Bhatt (@aliaa08) March 15, 2021
या चित्रपटात तिच्यासह ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे आलिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘आरआरआर’ हा यावर्षी १३ ऑक्टोबर रोजी दस-याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकानी आलिया भट्ट, राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर आणि अॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत बुरख्यावर बंदी,एक हजाराहून अधिक मदरसेही होणार बंद
- इशानच्या उत्तम कामगिरीमुळे सिनिअर खेळाडूची जागा धोक्यात?
- भाचा कृष्णा अभिषेकच्या वादावर गोविंदाचे मोठे भाष्य
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- बँकांच्या खासगीकरणावर आरबीआयच्या माजी गव्हर्नर राजन यांनी केली चिंता व्यक्त


