Share

‘या’ कारणामुळे आलीया भट्ट जाणार थायलंडला, ऐकूण व्हाल थक्क

Published On: 

मुंबई : आलीया भट्ट सध्या थायलंडला जायच्या विचारामध्ये आहे. याआधी देखील आलीया रणबीर कपूर सोबत थायलंडला गेली होती. पण त्यावेळी त्या दोघांचे लग्न झालेले नव्हते. ते दोघे २०२० साली थायलंडला गेले होते. पण यावेळी आलीयाचे थायलंडला जाण्याचे कारण वेगळेच आहे.

आलियाचा नुकताच आलेला चित्रपट गंगुबाई काठियावाडी हा थायलंडमध्ये प्रचंड गाजला आहे. तेथील प्रेक्षक कामाठीपुराची राणी बनलेल्या आलियाला पसंत करत आहेत. थायलंडच्या मुली चित्रपटातील गाण्यांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. भारतात देखील एवढा चित्रपट हीट झाला नाही जेवढा थायलंडमध्ये झाला आहे. नेटफ्लिक्सवर थायलंडमध्ये हा चित्रपट सातत्याने टॉप ट्रेंडिंग आहे. यासोबतच ट्विटर आणि इंस्टाग्रामवर चित्रपटाचे हजारो व्हिडिओ, रील्स आणि मीम्स अपलोड करण्यात आले आहेत. गंगूबाईच्या कथेचे, लूकचे आणि संवादांचे लोकांना वेड लागले आहे.

आलियाने यापूर्वी नेटफ्लिक्सच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले होते. आणि त्याचबरोबर येत्या काही दिवसांत चाहत्यांना भेटण्यासाठी थायलंडला येणार असल्याचेही तिने सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!