Share

Sachin Sawant : “सरकारच्या स्थिरतेवर भाजपाच्या गोटात शंका…”, सचिन सावंत यांचा इशारा

Published On: 

मुंबई: राज्यात अनेक मोठ्या घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला  अजूनही मुहूर्त लागलेला नाही. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे.

“नवीन सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ११ तारखेनंतर होणार आहे. सरकारच्या स्थिरतेवर भाजपाच्या गोटात शंका दिसत आहे. राज्यात भाजपाच्या सत्तेच्या लालसेपोटी आलेली अस्थिरता, प्रलंबित प्रश्न व नैसर्गिक सावट पाहता मंत्रीमंडळ नसणे हे दुर्दैवी आहे. काही अघटीत घडले तर हे सत्तालोभी जबाबदार असतील.”, असा इशारा सचिन सावंत यांनी ट्वीट करत दिला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी  केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे ११ तारखेनंतर मोठ्या घडामोडी होण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!