Share

गंगुबाईची थेट हॉलिवूड मध्ये एन्ट्री; ‘Heart of Stone’ मध्ये झळकणार आलिया भट्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : या चित्रपटात आलियाने गंगुबाई ही भूमिका साकारली असून सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. विशेष म्हणजे आलियासाठी हे नवीन वर्ष करिअरच्या दृष्टीने खास ठरत आहे. कारण, गंगुबाईनंतर आता आलिया चक्क हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन आलियाच्या अपकमिंग चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टनुसार, आलिया Heart of Stone या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

‘Heart of Stone’ हा स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आलियासोबत गॅल गॅडोट  आणि Jamie Dornan हे स्क्रीन शेअर करणार आहेत. तसंच टॉम हार्पर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.दरम्यान, सध्या तरी या चित्रपटाविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा आलियाचा हॉलिवूडमधील डेब्यू मुव्ही आहे. तसंच या चित्रपटात आलिया नेमकी कोणती भूमिका साकारणार हेदेखील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!