Share

“कितीही छापे टाकले तरी घाबरणार नाही”- संजय राऊत

Published On: 

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषद घेतली आहेत. राज्यात मागच्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरु आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल संजय राऊत यांनी देखील भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.  दरम्यान, राऊतांची पत्रकार परिषद सुरु होण्याच्या आधीच राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या आहेत. तसेच आज सकाळपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नीकटवर्तीय राहुल कनाल, अनिल परबांचे सी.ए. आणि आणखी काही लोकांच्या घरी आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. त्यावर राऊत आणि प्रतिउत्तर दिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी कितीही कारवाई केली, छापे टाकले तरी आम्ही घाबरणार नाही, शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते यांच्या केसालाही तुम्ही धक्का लावू शकत नाही असं राऊत म्हणाले. देशातील ईडीचा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. पुढच्या काळात आणखी काही घोटाळे आपण उघड करणार आहोत. यामध्ये कुणाला काय मिळालं हे सुद्धा सांगणार आहोत, असं राऊत म्हणाले.

सोमय्या पिता-पुत्र जेलमध्ये जाणार

किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांना वाधवान यांच्या निकॉन इम्फ्रामध्ये महत्वाची जबाबदारी देण्यात आली. ज्या कंपन्यांवर सोमय्यांनी आरोप केले, त्याच कंपन्यांचे सोमय्या पार्टनर झाले. ज्या कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. त्यांच्यासोबत नील सोमय्या व्यावसायिक भागीदार कसे होऊ शकतात, याचं उत्तर भाजपचा कोणताच नेता देऊ शकत नाही. या प्रकरणात पिता-पुत्र जेलमध्ये जाणार असं राऊत म्हणाले. त्यामुळे आता खर्च सोमय्या जेलमध्ये जाणार का हे लवकरच कळेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!