Share

गजर भक्तीचा! ‘बिग बॉस’मध्ये किर्तनकार शिवलीला पाटील यांची धमाकेदार एंट्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बिग बॉस मराठीला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन कालपासून सुरवात झाली.  बिग बॉस मराठी सीजन तीनमध्ये 15 सेलिब्रीटी असणार आहेत. या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध किंवा चर्चेतील व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यंदाच्या सीजनमध्ये प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांनी देखील सहभाग घेतला आहे.

शिवलीला पाटील या मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या कन्या आहेत. शिवलीला पाटील यांची ‘बिग बॉस’मध्ये भक्तीमय वातावरणात एंट्री झाली. दरम्यान, शिवलीला यांची आई त्यांना भेटण्यासाठी आले असता त्यांनी शिवलीला नाव ठेवण्यामागचे कारण सांगितले. त्या म्हणाल्या की, लग्नानंतर जवळपास सात वर्षे त्यांना मुल झाले नव्हते. त्यामुळे, त्यांनी शिवलीला ग्रंथाचं १०८ वेळा पारायण केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बाळ झाल्याचे स्वप्न पडले.

पुढे त्या म्हणाल्या, शिवलीला यांच्या आईने स्वप्नाबाबत त्यांच्या आईंना सांगितले. पण, आईंनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. जेव्हा, शिवलीला यांच्या आई डॉक्टरकडे गेल्या तेव्हा डॉक्टरांनी त्या गरोदर असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी मुलीचे नाव शिवलीला ठेवले असल्याचे त्यांच्या आईने सांगितले.

दरम्यान शिवलीला यांच्यासोबतच यावर्षीच्या शोमध्ये प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे देखील सहभागी झाला आहे. तसेच अभिनेत्री सोनाली पाटील, स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, सुरेखा कुडची, गायत्री दातार, मीनल शाह यांच्यासह अभिनेता विशाल निकम, अक्षय वाघमारे यांच्यासह जय दुधाने, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर हे कलाकार सहभागी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!