औरंगाबाद : कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. आज (दि.२६) घाटी रूग्णालयामध्ये दिवसभरात २१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यात घाटीत उपचार घेत असलेल्या २१ जणांचा मागील २४ तासात मृत्यू झाला आहे.
सध्या घाटीत उपचार सुरू असलेल्या ६०४ रुग्णांपैकी ३९६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर १२३ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे. घाटीत अतिगंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, जुने आजार असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या चोवीस तासात २१ जणांचा घाटीत मृत्यू झाला आहे. यातील बहुसंख्य वयोवृध्द रुग्ण आहेत.
या मृतांमध्ये भानुदासनगरातील ९० वर्षीय वृध्दाचा, जालन्यातील वालसावंगीमधील ७० वर्षीय वृध्देचा, कटकट गेट येथील ५४ वर्षीय वृध्दाचा, औरंगपुरा भागातील ७७ वर्षीय वृध्दाचा, अहमदनगर, पडेगावातील, उस्मानपुरा, मिलिंदनगरातील, कन्नड येथील, पडेगावातील ५२ वर्षीय वृध्दाचा, कन्नड येथील ७१ वर्षीय वृध्देचा, नांदेड, गदीपुरा येथील ६० वर्षीय वृध्देचा, सिडकोतील ५६ वर्षीय वृध्देचा, कन्नड, सुवर्णा पालेश्वर कॉलनीतील ६७ वर्षीय वृध्देचा, सिल्लोड, घाटंब्री येथील ८० वर्षीय वृध्दाचा, वैजापूर, लासूरगावातील ८४ वर्षीय वृध्दाचा, बेगमपु-यातील ६७ वर्षीय वृध्दाचा, पहाडसिंगपुरा, स्वप्नपुर्ती कॉलनीतील ९५ वर्षीय वृध्देचा, जुना बाजारातील ८६ वर्षीय वृध्दाचा, सिडको, एन-६, शुभश्री कॉलनीतील ६५ वर्षीय वृध्देचा, भावसिंगपुरा भागातील ६१ वर्षीय वृध्देचा, सिडको, एन-६ येथील ६५ वर्षीय वृध्दाचा तर हडको कॉर्नर येथील ८५ वर्षीय वृध्देचा समावेश आहे.
दरम्यान, आतापर्यंत घाटीत १ हजार २२० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जणांना बरे झाल्याने शुक्रवारी घाटीतून सुट्टी देण्यात आली. घाटीत आतापर्यंत पाच हजार ९३१ कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच तीन हजार ४२६ जणांना उपचाराअंती सुट्टी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात खाटाच्या माहितीसाठी कोविड -19 चौकशी कक्ष सुरु
- बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात मीही सहभागी होतो – नरेंद्र मोदी
- कोरोना पुन्हा वाढतोय ; केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले राज्यांना ‘हे’ कडक निर्देश
- विराट कोहलीचा आणखी एक विक्रम; ठरला केवळ दुसरा फलंदाज
- नांदेडमध्ये पुरेसे बेड, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही : जिल्हाधिकारी


