Share

बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात मीही सहभागी होतो – नरेंद्र मोदी

Published On: 

🕒 1 min read

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मोदींच्या या दौऱ्याचा कारण देखील खास आहे. बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते,’ असे उद्गार यावेळी मोदींनी काढले आहेत.

‘बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी बांगलादेशमध्ये आणि भारतातही प्रयत्न सुरू होते. बांगलादेशमधील जनतेची भावना भारतीयांना समजत होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षात सहभागी होणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्याली पहिल्या आंदोलनांपैकी एक आहे. मी २०-२२ वर्षांचा असताना माझ्या इतर सहकाऱ्यांसह बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारतात सत्याग्रह केला होता,’ अशी आठवण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख मुजीबुर रहमान यांना मरणोपरांत घोषित झालेला गांधी शांती पुरस्कार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे सुपुर्द केला. बांगलादेश आणि भारताचे संबंध अधिक दृढ होत आहेत. त्यामुळे मला हा पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे, असं ते म्हणाले. तसेच बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल राष्ट्रपती अब्दुल हामिद आणि पंतप्रधान शेख हसीना यांचे त्यांनी आभारही मानले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!