🕒 1 min read
नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोविड-19 रूग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ते नियोजन केले आहेत. रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत, अशी ग्वाही नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य विभागाकडून वेळोवेळी सर्व बाबींचा आढावा घेतला जात आहे. तर याला लागणारी पुरेशी व्यवस्था याबाबतचे नियोजन देखील केले जात आहे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी सिद्ध आहे. नागरिकांनी आरोग्याची त्रिसूत्री काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी या वेळी केले आहे. बेडसंदर्भात झालेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पुरेशा बेडसह औषध व इतर उपचार साहित्याची नांदेड जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. मी स्वत: विविध हॉस्पिटलला जाऊन भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आलो असल्याचे जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.
काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून आवश्यकता नसताना अनेकांनी दवाखाण्यातील बेड अडवून ठेवले आहेत. केवळ भितीपोटी जर कोणी हे कृत्य करत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही. मी अनावश्यक जे दवाखाण्यात भरती झाले आहेत. त्यांना घरी उपचार घेण्यास सांगून 10 ते 12 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देऊन आलेलो आहे. त्या रुग्णांवर सहजपणे घरी उपचार होणे शक्य असल्याची खातरजमा देखील केली असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी आजार न लपवता सौम्य लक्षणे आढळली तरीही, कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी या वेळी नागरिकांना केले आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या. आवश्यकता असल्यास आपल्याला रूग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केले जातील. अनावश्यक काळजी करू नका. मात्र कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, शारिरीक अंतर ठेवणे, आणि सतत सॅनिटायजरचा वापर करणे यातच नागरिकांचे हित असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील, बाहेरच्यांनी…काँग्रेसचा राऊतांना टोला
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
