Share

कोरोना पुन्हा वाढतोय ; केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले राज्यांना ‘हे’ कडक निर्देश

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यातच महाराष्ट्रामध्ये कोरोनाची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाकडून खबरदारी म्हणून राज्यातील काही भागामध्ये लॉकडाऊन करण्यात आले, तर काही ठिकाणी कडक नियम लागू करण्यात आले.

राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

देशभरात कोरोनाचा कहर वाढत असल्या कारणाने गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश पाठविले आहे. देशातील अनेक भागात रुग्णसंख्या आणि मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी गृहमंत्रालयाने देशभरात निर्देश जारी केले असून राज्य सरकारांना त्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्रालयाच्या निर्देश खालीलप्रमाणे :-

  • राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी Test-Track-Treat या प्रोटोकॉलनुसार आखणी करावी.
  • शाळा, कॉलेज, मल्टिप्लेक्स, जिम, आदी ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जात आहे की, नाही याकडे अधिक कडकपणे लक्ष दिलं जावं.
  • आगामी काळात येणारे सण उदा. होळी, शब-ए-बारात, इस्टर, आदी उत्सवांदरम्यान गर्दी जमा होणार नाही यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक पावले उचलली जावीत.
  • अशा ठिकाणी फिरताना मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जावेत.
  • येत्या काळात सण-उत्सवांदरम्यान गर्दी जमा होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाबरोबरच, पोलिसांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
  • गर्दी वाढण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं गेलं तर कोरोनाची साखळी तोडणं शक्य होणार आहे.

देशभरातून समोर येणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे. दररोज नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात अॅक्विटिव्ह रुग्णांची संख्या आता ४ लाखापेक्षा अधिक झाली आहे. इतकंच नाही तर केवळ ५ दिवसातच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ लाखावरुन ४ लाखावर पोहोचली आहे. गुरुवारीदेखील कोरोनाचे ५९ हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत. मागील १५९ दिवसांमधील ही सर्वात मोठी संख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!