Share

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम; ठरला केवळ दुसरा फलंदाज

Published On: 

पुणे: इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकातील दुसरा सामना पुणे येथे खेळवला जात आहे. सलग दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. इंग्लंडच्या संघाने पुन्हा भारतीय संघाला ,,साठी पाचारण केले. या सामन्यातही भारतीय फलंदाजानी दमदार प्रदर्शन करत भारताला ३३६ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून के.एल. राहुलने शानदार शतक साजरे केले तर कर्णधार कोहली आणि पंतने अर्धशतक केले.

या सामन्यात फलंदाजी करताना भारताचा कर्णधार विराटने एका खास विक्रम नोंदवला आहे. आणि हा विक्रम नोंदवणारा तो जगातील केवळ दुसऱाच फलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजार धावांचा टप्पा कोहलीने पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ दुसराच फलंदाज आहे. विराटच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलीयाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने केलेला आहे. पॉन्टिंगने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत १२ हजार ६६२ धावा केल्या आहेत.

विराटने हा विक्रम नोंदवत कुमार संगकारा, जॅक कॅलिस, केन विलियमसन यांना मागे टाकले आहे. संगकाराने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९ हजार ७४७ धावा केल्या होत्या. तर कॅलिसने ७ हजार ७७४ आणि विलियमसनने ५ हजार ४२१ धावा केल्या होत्या. याबरोबरच विराटने तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जलद १० हजार धावा करण्याचा विक्रमही केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!