नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात कोविड – 19 चौकशी कक्ष 24 तासासाठी सुरु करण्यात आला आहे. या कक्षात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 24 तास उपलब्ध राहणार आहेत. येथील दूरध्वनी क्रमांक 02462 – 229221 असा आहे. या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती येथेच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या चौकशी कक्षामुळे नागरिकांची होणारी धावपळ देखील कमी होणार आहे. तसेच अचुक माहिती मिळाल्यामुळे रग्णांना कोणत्या रुग्णालयात दाखल करता येणार असल्याची माहिती देखील या वेळी मिळणार आहे. जिल्ह्यासह, शहरातील तसेच इतर ठिकाणाहून किंवा रुग्णालयातून संदर्भीत होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी वरील दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क करुन खाटा उपलब्ध असल्यास रुग्णाला येथे संदर्भीत करावे. रुग्ण संदर्भीत करतांना रुग्णाचे आधार कार्ड व रेशनकार्ड सोबत आणण्यास संदर्भीत करणाऱ्या रुग्णालयाने सांगावे जेणेकरुन रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देता येणार आहे.
कोरोनामुळे मृत्त पावलेल्या व्यक्तीच्या देहाच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी डॉ. अक्षय गव्हाणे यांचा भ्रमणध्वी क्रमांक 9527895183 येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जनऔषधवैकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख यांनी केले आहे. तसेच शहरातील नागरिकांनी या चौकशी कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहन देखील या वेळी करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील, बाहेरच्यांनी…काँग्रेसचा राऊतांना टोला
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

