Share

अंडरटेकरच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर अक्षय कुमारने दिले असे उत्तर म्हणाला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी म्हणुन संबोधले जाते. कारण खिलाडी हे नाव असलेल्या अनेक चित्रपटात त्याने काम केले त्यामुळे त्याचे नाव खिलाडी पडले. त्याच्या खिलाडी चित्रपटाच्या मालिकेतील एक चित्रपट म्हणजे ‘खिलाडीयो का खिलाडी’. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शानाला 25 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल अक्षय कुमारने या चित्रपटात अंडरटेकरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे खरे ब्रायन ली हे आहे असा खुलासा केला.

अक्षय कुमारच्या या पोस्टवर खऱ्या अंडरटेकरने प्रतिक्रिया देत अक्षय कुमारला खरी फाईट खेळण्याचे आमंत्रण दिले होते. यानंतर खिलाडीचे चाहते अक्षय कुमार काय प्रतिक्रिया देतो याकडे लक्ष देऊन होते. अखेर अक्षय कुमारने त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, ‘भावा पहिले मला माझा विमा बघु दे मग मी तुला कळवतो’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेनंतर हा संवाद इथेच थांबला का खरच पुढे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. काही चाहत्यांनी अक्षय कुमार आणि अंडरटेकर एखाद्या चित्रपटात एकत्र दिसतील असा अंदाज देखील व्यक्त केला आहे.

अक्षय कुमार आणि अंडरटेकर दरम्यानचा हा संवाद तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी कमेंटस् मध्ये दोघांनी एकत्र काम करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. आगामी काळात अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट 27 जुलै रोजी प्रदर्शीत होणार आहे. यानंतर 15 ऑगस्ट रोजी सुर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याव्यतीरिक्त अक्षयचा अतरंगी रे हा चित्रपट बनुन तयार आहे. तर तो सध्या पृथ्वीराज चौहान, बच्चन पांडे, रक्षा बंधन आणि राम सेतु या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

https://www.instagram.com/p/CQDXFsMtHrH/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!