Share

समाजसेवेच्या नावाखाली अक्षय बोऱ्हाडेचं पाप; आता एका तरुणीने केला बलात्काराचा आरोप

Published On: 

पुणे : शिरोली बुद्रुक येथील अक्षय मोहन बोऱ्हाडे हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. समाजसेवा करणारा म्हणून सोशल मीडियामध्ये तरुणांच्यात क्रेझ असलेल्या अक्षय बोऱ्हाडे याला आधी खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची पत्नी रुपाली बोऱ्हाडे हीने अक्षयवर गंभीर आरोप केले. आणि आता एका तरुणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे अक्षय बोऱ्हाडे याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

एका तरुणीने अक्षय विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आज (६ सप्टेंबर) रोजी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीने अक्षय, सासू सविता बोऱ्हाडे, दीर अनिकेत बोऱ्हाडे यांनी आपला प्रचंड छळ केल्याचा आरोप केला आहे. सासरच्यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वेळोवेळी रिव्हॉल्वर आणि गुंडांचा धाक दाखवून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. कोणतेही काम न करता शिवऋण संस्थेतून आलेल्या निधीचा वापर स्वत:च्या चैनीसाठी केला. तसेच, अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवला असे गंभीर आरोप रुपालीने केले आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अक्षय बोऱ्हाडे फसवणूक करतो’

‘अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लोकांना फसवतोय. तो जे बोलतो त्याच्यावर विश्वास न ठेवता खरी सत्यता काय ते तपासावं. मी पोलिसात याबाबत तक्रार केलीय. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही,’ असं स्पष्ट करताना त्याने शिवऋण संस्थेत आणलेल्या काही दिव्यांग व गरजू व्यक्तींसोबत देखील काही काळंबेरं केलं असल्याची शक्यता सांगितली आहे.

दरम्यान, रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कलम 498 (अ) , 420,406,324,323,504,506, 34 शस्त्र आधिनियम 25 (अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, सोशल मीडियाद्वारे मैत्री झाल्यानंतर अक्षयने रुपालीला प्रपोज केले. त्यानंतर दोघांचा विवाह झाला असल्याची माहिती रुपालीने एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!