Share

गेवराई तांडा येथील गॅस रिफिलिंग सेंटरवर चिकलठाणा पोलिसांचा छापा; १९३ गॅस सिलेंडरसह ६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Published On: 

औरंंगाबाद : गेवराई तांडा शिवार येथील बंद पडलेल्या वर्धमान ऑईल मिल कंपनीत अवैधरित्या घरगुती गॅस रिक्षात रिफिलींग करण्याऱ्या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या चिकलठाणा पोलिसांनी छापा मारून आवळल्या. अटकेत असलेल्या टोळीकडून पोलिसांनी १९३ गॅस सिलेंडर, दोन रिक्षा, गॅस रिफिलिंग सेंटरसाठी वापरण्यात येणारी मोटार, रोख रक्कम असा एकूण ६ लाख २५ हजार ५५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास नारायण गटकळ (वय २२, वाहेगाव ता. पैठण, ह.मु. तिरंगा कॉलनी, पंढरपुर,), गजानन मच्छिंद्र गायकवाड (वय २९, रा. सलामपुरे नगर, पंढरपुर), शेख लतीफ शेख मुसा (वय ३५, रा. सादात नगर रेल्वेस्टेशन), राजु रतन नरवडे (वय ४२, रा. बिडकीन ता. पैठण) आणि शिवाजी सुखदेव खरात (वय २९, रा. चितेगाव ता. पैठण) अशी अटकेत असलेल्या टोळीची नावे आहेत. गेवराई तांडा परिसरातील बंद पडलेल्या वर्धमान ऑईल मिल कंपनीत अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, जमादार संपत राठोड, दिपक देशमुख, दिपक सुरासे, अण्णा गावंडे, छाया नगराळे, सुरेखा सौंदरमल आदींच्या पथकाने छापा मारून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!