Share

कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नामदेव पवारांचे महसूल मंत्र्यांना साकडे

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. अशा शेतकऱ्यासंदर्भात काँग्रसचे माजी शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या आधी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

या संदर्भात माहिती देतांना पवार म्हणाले की, ‘कन्नड तालुक्यातील नागद सर्कल, अंधानेर सर्कल व बनोटी सर्कल येथे दि. ३० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूरांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील पिकं तसेच पशुधनावर मोठा परिणाम पडला आहे. याबाबत तातडीने तीनही ठिकाणी भेटी देऊन गावकऱ्यांची समस्या व नुकसानाबाबत माहिती घेतली. पुढे या संपूर्ण माहितीच्या आधारावर नुकसानग्रस्त शेतकरी व मजूर वर्गाला लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब यांची भेट घेऊन पत्र देऊ केले. यावेळी अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यात झालेलं एकंदरीत नुकसान व त्यातून हवालदिल झालेला शेतकरी, मजूर वर्ग मदतीच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती माननीय मंत्री महोदयांना दिली. चर्चेअंती थोरात साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.’

कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील या भागाची पाहणी केली आहे. मात्र, आता इथल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!