मुंबई:- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी केंद्राचा पद्म विभूषण पुरस्कार परत केला आहे. आज शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली आहे.
एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. “केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा मोडीत काढण्यासाठी देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही भेट घेत आहोत. सर्व पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही हे आव्हान करत आहोत” अशी प्रतिक्रिया खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी यावेळी दिली. शिरोमणी अकाली दलाची भूमिका मान्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीदरम्यान सांगितले.
दरम्यान, मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाचा विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने सप्टेंबर महिन्यात थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आधी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अकाली दलाच्या एनडीएबाहेर पडण्याच्या पवित्र्याने भाजपला मोठा धक्का बसला होता.
महत्वाच्या बातम्या
- आदर पुनावाला ‘एशियन ऑफ दी इयर ’
- केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला
- आम्ही तीन पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही- हसन मुश्रीफ
- ‘दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांची वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच’
- ‘हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही’, सैफवर भडके भडकले राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

