Share

अजितदादा पूर्ण करा ‘तो’ वादा; एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी !

Published On: 

पुणे : कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. सबंध जग यातून सावरत असलं तरी भारताला या महामारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचे गंभीर व अधिक काळ परिणाम भोगावे लागत आहेत. आधीच विविध आरक्षणांमुळे अडकणाऱ्या शासकीय भरत्यांमध्ये कोरोनाची भर पडली. अनेक वर्ष परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणखी एका संधीची वाट पाहत तयारी करत आहेत, ज्या उमेदवारांची पूर्व परीक्षा झाली ते मुख्य परीक्षेची वाट पाहतायत तर ज्या उमेदवारांची मुख्य परीक्षा देखील झाली आहे ते नियुक्तीची वाट पाहतायत.

या सर्व चक्रामध्ये लाखो युवक-युवतींचे भविष्य हे अधांतरी टांगले गेले आहे. नियुक्ती होत नसल्याने स्वप्निल लोणकर याने टोकाचे पाऊल उचलले होते. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले होते. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत MPSC मार्फत 15511 पदांची भरती केली जाईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर 30 जुलै 2021 वित्त विभाग शासन निर्णयानुसार (GR)प्रमाणे प्रत्येक विभागाने 30 सप्टेंबर 2021 MPSC आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत असे निर्देश देण्यात आले होते.

विविध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी कोणत्या विभागाने MPSC आयोगाकडे मागणीपत्र पाठवले नाहीत त्यामुळे MPSC आयोगाने नवीन वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले नाही. तसेच नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या नाहीत. मागील 2 वर्ष झाली MPSC आयोगाची नवीन जाहिरात आली नाही. त्यामुळे नव्या भरतींसाठी तयारी करणारा युवक वर्ग हा संभ्रमात असून इतर अडचणींमुळे सरकारी नोकरी आणि राज्याची सेवा करण्याचे स्वप्न भंग पावत असल्याचे देखील समोर येत आहे.

आता सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांना MPSC आयोगाकडे लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून 15511 पदांची भरती करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी एमपीएससीचे विद्यार्थी करत आहेत. तर अजित पवार हे भरतीसंदर्भातील विधानसभेत दिलेला शब्द पूर्ण करतील याकडे अपेक्षा लावून बसले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!