Share

दानवेंना मी या आठवड्यात दोनदा भेटलो, असेच भेटत राहिलो तर…; देसाईंच्या विधानामुळे चर्चांना उधाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून केलेल्या विधानामुळे मागील आठवड्यापासून राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘एकत्र आले तर भावी सहकारी’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्याकडे पहिले होते. यावेळी मंचावर काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीबाबत तर्क-वितर्क लावले जात होते.

दरम्यान, राज्याच्या विकासासाठी प्राधान्य देत नेते एकत्र येत असल्याचे म्हणत सर्व पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत. रावसाहेब दानवे आणि मी या आठवड्यांत दोनदा भेटलो, आम्ही असेच जास्त भेटत राहिलो तर महाराष्ट्राचा विकास निश्चित आहे असे विधान देसाई यांनी केले असून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विकास कामांबाबत आशादायी संकेत मिळत आहेत.

दरम्यान, देसाई यांच्या या विधानाचा संबंध भाजप-सेना युतीशी देखील जोडला जाऊ लागला आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंत गीते यांनी महाविकास आघाडीबाबत केलेलं धक्कादायक विधान आणि शिवसेना-भाजप नेत्यांची वाढत असलेली जवळीक पाहता चर्चांना उधाण आलं आहे. तर, ‘मी सुभाष देसाईंच्या मताशी सहमत आहे, आम्ही असेच रोज भेटत राहिलो तर राज्याचा विकास निश्चित आहे,’ असे वक्तव्य करून रावसाहेब दानवे यांनी देसाईंच्या विधानाला दुजोरा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!