Share

‘पवारांनी काँग्रेसला सोडले नाही, तर त्यांना बाहेर काढण्यात आले’, आठवलेंनी केला खुलासा

Published On: 

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केलेत. ‘शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, या शब्दांत गीते यांनी निशाणा साधला. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, रिपाईंचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही गीते यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘अनंत गीते यांचं वक्तव्य योग्य नाही. शरद पवार सन्माननीय नेते आहेत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं नाही’ अशी भूमिका आठवलेंनी मांडली.

तसेच ‘शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार करावे. भाजपा-सेनेने एकत्र यावे आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला पाहिजे. ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आले पाहिजे असे आवाहनही आठवलेंनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!