Share

…अन् संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही’

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र भाजपने ते किरीट सोमय्या यांनी सुरू ठेवलं. अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडायला सुरुवात केल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.या सर्व प्रकरणावर केंद्रही लक्ष ठेवून आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी, मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण १२ जणांनी विविध भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असून मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सुरु आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना सोमय्या यांचे आरोप आणि त्यांच्यावरील कारवाईबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही.’

पुढे त्यांनी सोमय्या यांना अप्रत्यक्षपणे सल्ला देखील दिला आहे. ‘या देशात प्रत्येकजण आप-आपल्या पध्दतीने काम करत असतो. जर एखाद्याकडे विशेष काही माहीती असेल तर त्याने ती माहीती राज्यातील पोलीस दलाला द्यावी. महाराष्ट्रातील सरकार कायद्याच्या चाैकटीत राहून काम करणारे सरकार आहे,’ असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!