नाशिक : पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांच्या वनमंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता. कथित ऑडिओ क्लिप्स समोर आल्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या. तर, हे प्रकरण सुरु असताना २ आठवडे गायब असलेल्या संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन करून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते.
संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर बंजारा समाजाने राज्यभरात निदर्शने केली होती. आता याप्रकरणावर नाशिक मधील पत्रकार परिषदेत संजय राठोड यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. ‘माझ्यावर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी मी स्वतःहून राजीनामा दिला. माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वाचून दाखवला. बहुदा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो वाचून दाखवावा ही पहिली वेळ असावी, त्यामुळे माझ्यावर मुख्यमंत्र्यांचे असलेले प्रेम अधोरेखीत झाले,’ असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राठोड यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने राज्यभर ‘बंजारा‘ समाज बांधवांशी संवाद आयोजित केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा मंत्रिपद मिळण्याबाबत देखील भाष्य केलं. मंत्रिपदाच्या दबावासाठी नव्हे तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या समाज संघटनेच्या माध्यमातून राज्यभर ‘ बंजारा ‘ समाज बांधवांशी संवाद साधून, समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा सुरू असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, राजकारण हा माझा व्यवसाय नाही, ज्या समाजातून मी आलोय त्या समाजाचा मी देणे लागतो. म्हणून माझे हे सामाजिक कार्य सुरु आहे, असं देखील राठोड यांनी यावेळी नमुद केलं.
महत्वाच्या बातम्या
- अनंत गीतेंनी पवारसाहेबांच्या पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले होते; तटकरेंचा गौप्यस्फोट
- दानवेंना मी या आठवड्यात दोनदा भेटलो, असेच भेटत राहिलो तर…; देसाईंच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- ‘..तर युपीत रोज अधिवेशन घ्यावे लागेल’, राज्यपालांच्या मागणीवर शिवसेनेची प्रतिक्रिया
- ‘सुप्रिया ताई, सोमय्यांचे लक्ष सध्या बेनामी संपत्तीवर; वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’
- …अन् संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

