मुंबई : देशात एकीकडे कोरोनाची भयाण परिस्थिती असताना दुसरीकडे गेला महिनाभर आयपीएलचं वातावरण निर्माण होते. लॉकडाउनच्या काळात आयपीएल मॅचेस सुरू असल्याने अनेक क्रिकेटप्रेमी घरी बसून याचा आनंद घेत होते. मात्र काही दिवसांनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल मॅचेस स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला होता. तेव्हा आता अनेक क्रिकेटप्रेमी जुन्या व्हिडीओस पाहून आनंदी होत आहेत. असाच एक व्हिडीओ अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CNO_9Q9pR_w/?utm_source=ig_web_copy_link
सीसीएल म्हणजेच ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ मधील अभिनेता सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. सिद्धार्थने एक षटकार मारला होता. जो प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला होता. तर यामुळे अनेकांना धोनीच्या षटकाराची आठवण ही झाली होती. सीसीएल मधून ‘वीर मराठी’ या संघातून सिद्धार्थ खेळत होता. सिद्धार्थने यावेळी एक षटकार मारला त्यामुळे अनेकांनी सिद्धार्थचं कौतुक केले होत.
सिद्धार्थ नुकताच प्रदर्शित झालेला सलमानचा ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटात झळकला होता. यातील त्याच्या कामाचीही विशेष चर्चा होत आहे. त्याने ‘रणजीत मवानी’ हे पात्र साकारलं होतं. लवकरच सिद्धार्थ ‘बाल भारती’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘लग्न कल्लोळ’ या तीन नव्या चित्रपटांतही झळकणार आहे. काही दिवसापूर्वीच त्याने मराठी कलाकारसुद्धा कोरोना काळात मदत करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. पण तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो यावर त्याने आपले मत व्यक्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- ‘एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त!’, शरद पवारांच्या शोकभावना
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘मी माझ्या मित्राला गमावले’, राहुल गांधींना दु:ख अनावर
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’


