Share

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामुळे संजय लीला भन्साळी यांना दिवसाला ३ लाख रुपयांचा होतोय तोटा

Published On: 

मुंबई : देशात सध्या वाढत्या कोरोना व्हायरसमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. याची खबरदारी म्हणून  देशतील काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक क्षेत्राला याचा फटका बसला. मनोरंजन  क्षेत्रालाही चांगलाच फटका बसला. कारण लॉकडाऊनमुळे शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेक चित्रपटांचे शूटींग रखडले. यात आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचाही समावेश आहे. अलियाच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या शूटिंगचे केवळ ३ दिवस बाकी आहेत.

संजय लीला भन्साळी यांना लवकरचं चित्रपटाचे शूटींग संपवायचे होते पण आलिया पॉझिटिव्ह असल्यामुळे, तर कधी लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबवावी लागली. जोपर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत फिल्म सिटीमध्ये त्याचा मोठा सेट तसाचं उभा आहे. चित्रपटाचा सेट न काढल्यामुळे सह-निर्माता संजय लीला भन्साळी आणि जयंतीलाल गाढा यांना दिवसाला ३ लाख रुपयांचा तोटा होत आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट संपेपर्यंत उर्वरित दृश्यांचे शूटिंग सुरू करणार नसल्याचे निर्मात्याने म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/COch8kWldd_/?utm_source=ig_embed&ig_rid=055afcf6-04fe-42ad-90fe-102d050c86a9

गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट कोरोनामुळे संजय लीला भन्साळी ओटीटीवर प्रदर्शित करू शकतात अशी चर्चा मनोरंजन क्षेत्रात आहे. हा चित्रपट निर्धारित तारखेनुसार ३० जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. राज्य आणि देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे त्यामुळे त्यांना हा मोठा निर्णय घ्यावा लागणार असल्याचीही चर्चा आहे. आपल्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित कराण्याची त्यांची इच्छा होती. मात्र परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना ओटीटीचा सहारा घ्यावा लागणार असे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!