लातूर: राज्यात तसेच जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे ठिकठिकाणी कोविड रुग्णालये स्थापन करण्यात येत आहेत. तसेच कोरोनाचा आता ग्रामीण भागात देखील शिरकाव झाल्याने ग्रामीण भागात डेडिकेटेड कोविड रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. अनेक गावांमध्ये सेंटर सुरू करण्यात आले असले तरी काही ठिणकी नुसत्याच घोषणा करण्यात येत आहेत.
जळकोट तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वसामान्य गोरगरिब रुग्णांसाठी आरोग्य उपसंचालकांनी जळकोट येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलची घोषणा करुन आठवडा उलटला, मात्र तरीही हे हॉस्पिटल अजूनही कार्यान्वित होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येथे झालेल्या बैठकीत आरोग्य संचालक माले यांनी रेमडेसीवीर इंजेक्शन मिळेल, याची खबरदारी घेऊ, यासाठी जळकोट येथील मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहाची इमारत ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते.
परंतु, अद्यापपर्यंत ना डेडिकेटेड हॉस्पिटल सुरु झाले, ना मुलींचे वसतिगृहाची इमारत हस्तांतरित केली. आतापर्यंत तरी या हालचालीला वेग आला नाही. हॉस्पिटल चालू करण्याच्या इमारतीत कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन पाईपलाईन नाही. आरोग्य प्रशासनाने वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेऊन तात्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करुन रुग्णांची सोय करावी, अशी मागणी येथील रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. येथील रुग्णांना सध्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे. नंतर १०० खाटांचे हाँस्पिटल होऊन काय फायदा, असा सवाल रुग्ण नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- वकिलांच्या ‘त्या’ आक्षेपांवर सुप्रीम कोर्ट नाराज
- शहरात लसींचा ठणठणाट! आज केवळ आठ केंद्रांवर लसीकरण
- पाकिस्तानला मोफत लस देता मग देशात का नाही ? पटोलेंचा मोदींना सवाल
- निलंग्यात कोरोना तेजीत मात्र लसीकरण मंद गतीत
- परभणीचे जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे कोरोनामुळे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

