🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात सध्या भाजप व शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरबाबत विचारले गेले असता, या ऑफर बाबत मला काहीही माहिती नाही. मी आज त्यावर बोलू इच्छित नाही, असे म्हणत मुख्यमंत्री यांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यालाही वेळ आल्यावर उत्तर देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदाच्या ऑफर बाबतच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी आतापर्यंत अपेक्षा ठेवून कधीच काम केले नाही. आतापर्यंत केलेल्या कामामुळे वेगवेगळ्या संधी मिळाल्या. त्या संधीचे मी शिवसेनेसाठी सोनंचं केले. राज्याचे सर्वोच्च पद मिळाल्याचा आनंद आहे. गेली ३५ ते ४० वर्षे ज्यांनी शिवसेनेत काम केले. तब्बल ४० आमदार बाळासाहेबांचा विचार, विकासाचा अजेंडा, मतदारसंघाच्या विकासाचा निर्णय घेऊन पुढे जातात, तेव्हा हा निर्णय का घेतला, याच्या मुळशी जाण्याची गरज आहे. सत्तेत असूनही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनुसार विरोधात गेलो. यामध्ये वैयक्तीक कोणाचाही स्वार्थ नव्हता. आम्ही शिवसेना म्हणून ४० लोक एकजुटीचे दर्शन घडवत आहोत. वैचारिक भूमिकेतून आम्ही एकत्र आलो आहेत.’
शिवसेनेतील आमदार फोडण्यासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखवून फसवण्यात आल्याचे आरोप शिवसेनेतील काही नेत्यांनी केले होते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की अशा गोष्टींमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही सर्वजण एका वैचारिक भूमिकेतून एकत्र आलो होतो. त्याचबरोबर आम्हाला कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणांचा ही दाख दाखवण्यात आलेला नाही. माझ्यासोबत जी जी लोक आली ती स्वखुशीने आली होती. कोणालाही जबरदस्ती करण्यात आली नाही. या सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या बाबत झालेल्या अन्यायाची भावना त्यांच्या मनात होती. मला मुख्यमंत्री बनवण्यात या ५० आमदारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी कोणताही निधीची कमतरता भासणार नाही याची मी जबाबदारी घेतली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपकडे अपक्षांसह १२० आमदारांचे पाठबळ असूनही त्यांनी एका बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवले. माझ्याकडे फक्त ५० आमदारांची संख्या असूनही मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. ते सर्वांना डोळ्यात अंजन घालायला लावणारे आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणार आहे. मला मुख्यमंत्री बनविण्यात फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
