Share

Sanjay Kute : “मी सुरतला योगायोगाने गेलो होतो” ; संजय कुटे यांची गुगली

Published On: 

मुंबई : भाजपचे आमदार संजय कुटे यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.राज्यातील सत्तांतराचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस होते असा खुलासा करत बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार देखील देवेंद्र फडणवीस आहेत असे विधान केले आहे. “महाराष्ट्राच्या इतिहासातील हे ऐतिहासिक सत्ता नाट्य होतं यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सूत्रधार होते. त्यानंतर जे घडलं त्यामुळे भाजपातले काही लोक नाराज झाले असतील. पण फडणविसांसारखा त्याग मूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राला मिळाला याच आम्ही भाग्य समजतो” असं देखील संजय कुठे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत मध्ये गेले आणि तिथून गुवाहाटी मार्गे गोव्यामध्ये आले. या सर्व घटनाक्रमामध्ये शिवसेना आमदार आणि मंत्री सुरत मध्ये असताना भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी सुरत मध्ये योगायोगाने गेलो असल्याची गुगली टाकली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सुरतला वैयक्तिक कामासाठी गेलो असल्याच सांगितलं.

त्याबरोबरच “मला या सत्तानाट्ट्यामधील काहीच माहित नव्हतं. तिथं गेल्यावर मला वाटलं इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझे शिवसेनेशी  वीस वर्षांपासून असलेले संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. शिवसेनेचे आमदार आणि माझी नैसर्गिक मैत्री आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर मला सर्व प्रकार माहित झाला. तोपर्यंत मला काहीच माहित नव्हते. शिवसेना आमदारांनी आग्रह केल्यामुळे मी त्यांच्यासोबत थांबलो” असा गौफ्यस्फोट संजय कुटे यांनी केला.

मी भाजपमध्ये २००४ साली आलो. तेव्हापासून मी भाजप व शिवसेना एकत्र पाहत आहे. शिवसेना-भाजपच्या आमदारांत छान ट्युनिंग आहे. भविष्यातही तेच ट्युनिंग दिसणार त्यामुळे मंत्री म्हणून आग्रहास्तव त्यांनी थांबविले, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!