🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदेंनी भाजपचा हात धरत नव्हे सरकार स्थापन केले. त्याचबरोबर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने ‘देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नातही विश्वास ठेवू नका’ अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अनिल गोटेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस हे कधीही कोणालाही धोका देऊ शकतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असा सल्लाही मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत काही आमदारांचे समर्थन घेत सेनेशी बंड पुकारले. महा विकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या बऱ्याचश्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. हा सर्व घटनाक्रम पाहता भाजपने राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. त्यामुळे आता महाविकास आघाडी व शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी फडणवीसांवर विश्वास ठेवू नका असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे सर्व आमदार गोव्याहून मुंबईत दाखल होणार आहेत. शिंदे गटातील हे सर्व आमदार व भाजपचे आमदार यांच्यामध्ये संयुक्तपणे एक बैठक घेतली जाणार आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षांच्या निवड प्रक्रिये बाबतही या सर्व आमदारांमध्ये चर्चा होणार असल्याचीही माहिती आहे. शिंदे गटातील आमदार मुंबईत दाखल होणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांतता बाळगण्याचा आदेश दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
