औरंगाबाद :साठ वर्षांवरील जेष्ठांसह इतर आजार असलेल्या नागरिकांसाठी सोमवारी (दि.१ ) महापालिकेच्या वतीने कोरोना लस देण्यास प्रारंभ झाला. तीनही लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच जेष्ठांसह इतर आजार असलेल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. सर्व केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावून कोरोनाचा पहिला डोस घेतला. यात तरुणानांही लाजवेल असा जेष्ठांचा उत्साह यावेळी दिसून आला.
पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी वारंवार व्यत्यय येत असल्यामुळे ऑफलाईन नोंदणी करुन लसीकरण केले जात होते. बन्सीलालनगर आरोग्य केंद्रात माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, उद्योजक राम भोगले, उल्हास गवळी यांनी कोरोना लस घेत लसीकरणाला सुरूवात केली.
पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरातील बन्सीलालनगर, सिडको एन- आणि एन-८ येथील आरोग्य केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान जेष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या नागरिकांना कोरोना लस देण्याची सुरूवात केली आहे. दरम्यान, सकाळी पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बन्सीलालनगर येथील आरोग्य केंद्रास भेट दिली.
या ठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची आस्तेवाईकपणे चौकशी करुन त्यांचे गुलाब पुष्प देऊन माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, उद्योजक राम भोगले, उल्हास गवळी, विवेक देशपांडे यांनी कोरोना लस घेतली.
या ठिकाणीही जेष्ठ नागरिकांची गर्दी झाली होती. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पाडळकर यांनी तीनही केंद्रांवर जाऊन लसीकरणाचा आढावा घेतला. घरात मुले, सुना, नातवंडे असतात. नातवंडे अंगा-खांद्यावर खेळतात. आपले कुटुंब सुरक्षीत राहिले पाहिजे, या भावनेतून व कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही लस घेतली असल्याची भावना ज्येष्ठांनी व्यक्त केली. लसीकरणाला जेष्ठ महिलांचाही चांगला प्रतिसाद दिसून आला.
महत्त्वाच्या बातम्या
- सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
- खळबळ! जिल्हाधिकारी कार्यालयातून हायवाची चोरी, तिघे अटकेत
- ‘राठोडांना वेगळा अन् मुंडेंना वेगळा न्याय दिल्याने शिवसेनेत अंतर्गत वादळ’
- मुंबईकरांना बसणार आर्थिक भुर्दंड ! प्लॅटफॉर्म तिकिटात मध्य रेल्वेनं केली पाच पट वाढ
- नव्या नवरीचे नऊच दिवस; दहाव्या दिवशी झाला ह्रदयविकाराने मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

