मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे आज(११ फेब्रु.)पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात दौऱ्यावर आहे. आदित्य यांच्यासह मतदारसंघाची पाहणी केल्यानंतर दोन्ही नेते दादरमध्ये (Dadar) चैत्यभूमीजवळ पाहणी करण्यासाठी गेले होते.
राज्याचे पर्यावरण मंत्री @AUThackeray यांच्यासह दादर येथील चैत्यभूमी परिसर, वरळी, वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, हिल टॉप लेन आदी परिसरातील विकासकामांची आज पाहणी केली. pic.twitter.com/2QwqjCXrQD
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 11, 2022
यावेळी आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते, तर त्यांच्या शेजारच्या सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसले होते. अजित पवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघात कामाची पाहणी करण्याकरिता तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरिता सकाळीच हजर होत असतात. तसेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटन केले आहेत. ‘पुढे चला मुंबई’ अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंच्या या सोबतच्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी दादरमधील व्युइंग डेकसह वरळी सीफेसचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातील विकासकामांचे कौतुकही केले. तसेच दुरुस्तीच्या कामांचीही यावेळी अजित पवारांनी माहिती घेतली.
महत्वाच्या बातम्या:
- “सोमय्यांवरील हल्ला महागात पडेल”, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- IPL 2022 AUCTION: आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आणि वेळ जाहीर ; जाणून घ्या कधी होईल सुरुवात
- “कधी जीभ तर कधी पाय घरसणाऱ्याचा भाजप सत्कार करतय”, रुपाली पाटलांचा टोला
- विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट
- “राष्ट्रवादी पक्ष आहे की मुस्लीम लीग?”, भातखळकरांचा शरद पवारांना सवाल


