🕒 1 min read
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर नोव्हेंबर महिन्यात हल्ला झाला होता. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
नोव्हेंबर महिन्यात आटपाडीमध्ये झालेली शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेला हा हल्ला सुनियोजित कट होता असा दावाही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत हा गंभीर आरोप केला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात कोणावरही हल्ले झाले तर कायदा आणि सुव्यवस्था राखणं आमच्या पोलीस खात्याचे काम आहे. याबाबतची चौकशी आता मी मुंबईला निघालो आहे. मुंबईला गेल्यानंतर डीजी साहेब आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशीही बोलणार आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा देणे आणि कोणावरही अशा प्रकारचे हल्ले होऊ न देणे ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे. पण याबाबतची दुसरी बाजू देखील तपासली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, या सर्व हल्ल्याचे चित्रिकरण करताना पोलीस या व्हिडिओत दिसत आहेत. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवून आणला जात आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभा निवडीबाबत आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा; राज्यपाल म्हणाले…
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घ्या; बाळासाहेब थोरातांची मागणी
- पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणे चालवत असल्याचे अजित दादांनी आज सिद्ध केले- रुपाली पाटील
- ‘मी ‘त्या’ खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते’
- राष्ट्रवादी आणि आरएसएसचे संबंध कोणापासून लपलेले नाहीत; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
