Share

Ajit pawar | तिरुपती देवस्थान संदर्भात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंवर अजित पवार म्हणाले, …

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी तिरुपती, तिरुमाला देवस्थानच्या संदर्भात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंवर देखील भाष्य केले. मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून तिथे असं काही खरंच घडलं आहे का?, याबाबत विचारणा करावी, असे अजित पवार म्हणाले. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंचा गैरफायदा समाजकंटक घेत असतात, त्यामुळे व्हिडिओंची सत्यता पडताळल्याशिवाय असे व्हिडीओ शेयर करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

“तिरुपती, तिरुमाला देवस्थानशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो अथवा मूर्ती असलेल्या वाहनांना तिथे प्रवेश नाकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. या आधीही असाच प्रकार निदर्शनास आला होता. त्यावेळी मी तिथले ट्रस्टी मिलिंद नार्वेकर यांच्याशी बोललो आहे. पण त्यांना काही अडचण नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच तुम्ही आज या प्रकरणी स्टेटमेंट करा असं मी त्यांना सांगितलं आहे. कारण लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत. त्यामुळे अशा बातम्या येणं हे चुकीचं आहे”, असे अजित पवार म्हणाले.

नक्की काय घडले होते
काल तिरुपती, तिरुमाला देवस्थान परिसरातील चेकपोस्टवर नांदेडच्या एका युवकाची गाडी अडवण्यात आली. जर देवस्थान परिसरात दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर गाडीमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती काढून टाकण्यास सांगितले गेले. ही सगळी घटना सांगतानाचा या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परवाही अशीच एक घटना घडली होती आणि कालही ही तेच झाल्यामुळे महाराष्ट्रातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!