मुंबई : देशांतर्गत वाहतूक सुरु झाल्यानंतर त्याचबरोबर कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोना पुन्हा एकदा थैमान घालणार का ? पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्यं करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. ‘गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको’ म्हणत आपला विरोध दर्शवला आहे.
गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट गरिबांची अवस्था फारच बिकट झाली आहे. रोज काम केले तर त्यांचे घर चालते अशांना लॉकडाऊनचा फटका बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाऊन घोषित केले तेव्हा हा सर्व जण आदेश पाळत आले आहेत, असे सांगत कोरोना वाढू नये याची काळजी घेऊयात असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ज्यादिवशी हे अनैसर्गिक सरकार पडेल, त्याचदिवशी राज्याला एक सक्षम सरकार देऊ – फडणवीस
- आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राचा गुजरातपेक्षा जास्त विकास केला – देवेंद्र फडणवीस
- दुष्काळ निवारणासाठी काम करणारे अभिनेते मकरंद अनासपुरेंच्या नावाची राज्यपालांकडे शिफारस!
- चीनच्या पायाखालची वाळू सरकली म्हणे…’भारताची अॅपबंदी म्हणजे जागतिक व्यापार नियमांचा भंग’
- …अन् ‘त्या’ जखमी ऊसतोड कामगारास पंकजा मुंडेंनी दिला मायेचा आधार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

