मुंबई : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. येत्या १५ तारखेला या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काही दिवसांपूर्वी संपल्यानंतर आता मुख्य लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे.
यंदा ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी व गाव पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. खासदार उदयनराजे भोसले, आमदार निलेश लंके, आमदार सुनील शेळके आदी नेत्यांनी निवडणूक बिनविरोध केल्यास खास निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा केली होती.
दरम्यान, आता निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसा गावागावांत प्रचाराचा धुरळा उडत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, अनेकदा निवडणुकांमध्ये बंडखोरी होऊन दोन गट निर्माण होत असतात. याबाबत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी भाजपचे नेते प्रचारासाठी उतरणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजपचे बारा नेते मैदानात उतरणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यामुळे काही तरी काम करतोय, हे दाखवायचं आहे. त्यांच्या पक्षाने काय करावं, हा सर्वस्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांचा प्रश्न आहे. मी त्यावर भाष्य करणार नाही. पण ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष महत्त्वाचा नसतो. निवडणूक चिन्हं नसतं, एबी फॉर्म नसतो. सरपंच म्हणतात आम्ही तुमच्या पक्षाचे आणि काम करुन घेतात. मी तीस वर्ष या निवडणुका पाहतोय. दोन गट उभे राहतात. जो निवडून येतो तो म्हणतो, दादा आम्ही तुमचे. आम्ही पण म्हणतो, या बसा. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतो” अशी उपरोधिक प्रतिक्रिया पवारांनी देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘2024 ला मोदी 400 क्रॉस करणार तर काँग्रेसला एका बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार मिळणार’
- ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला… स्वबळावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- पासपोर्ट जप्तीवर वडेट्टीवारांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, मी स्वतः ईडीकडे जाऊन…
- मराठा समाजाची नाराजी दूर होणार ? मराठा नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- खा. प्रीतम मुंडे ऊसतोड कामगार पुत्राच्या मदतीसाठी मध्यरात्री आल्या धावून !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
