🕒 1 min read
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या १७ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दहावीच्या परीक्षा मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा पार पडल्या. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका कधी मिळणार यासंदर्भात माहिती निकालादिवशी कळविण्यात येणार आहे.
या संकेतस्थळावर पाहा निकाल –
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
